नाशिकच्या उबाठाचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचाररॅलीमध्ये 'व्होट जिहाद'चे नारे?

    18-Nov-2024
Total Views | 35

vote jihad 
 
नाशिक : (Vasant Gite) महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच व्होट जिहादच्या मुद्द्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या सगळ्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा व्हिडीओ आमदार नितेश राणेंनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांउटवर शेअर केला आहे. 
 
"एकबार फिर जिहाद का नारा देता हूँ... और इस जिहाद के लिए मेरा मुस्लिम समाज इस बार भी तैयार है..." अशी घोषणाबाजी उबाठाचे नाशिकमधील विधानसभा उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचार रॅलीमध्ये जिहादचा नारा देताना मुस्लिम समाजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
 
 
"येणाऱ्या २० तारखेच्या निवडणुकीला मशालच्या चिन्हावर व्होट देऊन आपण यांना पुन्हा निवडून देऊ असं मी आपल्यांकडून अपेक्षा करतो, यांना आज शब्द देतो की मुसलमान आपल्या शब्दाचा पक्का आहे. आम्ही आमचं काम करुन दाखवणार अशी मी वसंतभाऊंना ग्वाही देतो", असं म्हणत व्होट जिहादचे नारे देण्यात आले. या व्हिडीओमध्ये वसंत गीते व त्यांचे कार्यकर्ते मुस्लिम समाजासोबत दिसत असून मुस्लिम समाजाने गीतेंच्या विजयासाठी मतदानाचे आवाहन करत व्होट जिहादचा नारा दिला आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121