मोदींच्या सभेला विदेशी राजदूतांची हजेरी!

    18-Nov-2024
Total Views | 53

modi rally
 
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दादर येथे जनसमुदायाला संबोधिदत केले. मोदींना ऐकण्यासाठी हजारो लोक या सभेला जमले होते. याच सभेमध्ये काही विदेशी राजदूत सुद्धा उपस्थित होते जे पंतप्रधान मोदींना ऐकण्यासाठी आले होते.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे एका कार्यक्रमादरम्यान विविध देशातील राजदूतांना भेटले. या भेटी दरम्यान, महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने प्रचार करत आहे, या वर राजदूतांशी विनोद तावडे यांनी चर्चा केली. याच बरोबर या निवडणुकींमध्ये भारतीय जनता पक्ष विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजप महाराष्ट्र राज्याचे परराष्ट्र व्यवहार विभागाचे गौरव पटर्वधन यांनी विजय चौथाईवाले यांच्या नेतृत्वामध्ये या बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या कार्यक्रमाला उपस्थित होते. विदेश विभागचे डॉ. नकुल भारद्वाज हे दिल्लीवरून या बैठकीला सामील झाले होते.

हजारोंच्या संख्येने लोकं पंतप्रधान मोदींना ऐकायला येतात. सामान्या माणसांपासून ते अगदी पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत लोकांमध्ये एक वेगळाच जोश संचारलेला असतो. या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी विदेशी राजदूत महाराष्ट्रात आले होते. माजी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री श्री. व्ही मुरलीधरन, यांच्या सह मळबा देवी मतदारसंघातील भाजप उमेदवार शायना एनसी या देखील उपस्थित होत्या. त्याच बरोबर महाराष्ट्राचे भाजप नेते विश्व पाठक, अरुण लखानी, आशिष मेरखेड, हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121