कट्टरपंथी युवतीवर प्रेम केल्याने हिंदू तरुणाची हत्या

तरुणाच्या हत्येचे वृत्त अतिशयोक्ती असल्याचा मुहम्मद युनूस यांचा दावा

    18-Nov-2024
Total Views |
 
Hindu
 
ढाका : बांगलादेशात एका हिंदू (Hindu)  तरुणाला मौलाना आणि लष्कराने बेदम मारहाण केली. मुस्लीम तरुणीवर प्रेम केल्याने तरुणाची हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी सांगितले की, अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांचे वृत्त खोटे असून अतिशयोक्ति असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
याचपार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमाच्या रिपोर्टनुसार, ही घटना आता बांगलादेशातील ढाका विभागातील किशोरगंज जिल्ह्यात घडली आहे. येथील करीमगंज उपजिल्हा रहिवासी रिदॉय रोबी दास यांची शनिवारी १७ नोव्हेंबर २०२४ हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रिडॉयला त्यांच्या दुकानातून तीन मौलाना आणि इतर काही लोकांनी उचलून त्यांना नेण्यात आले होते.रिदॉयचे अपहरण करत आता स्थानिक प्रशासनातील काहींचा याप्रकऱणात समावेश आहे. त्याला आणि त्याच्या चुलत भावाला घेऊन एका अज्ञातस्थळी नेण्यात आले होते.
 
यावेळी असलेल्या काही मुस्लिम मौलानाने बेदम मारहाण करत अत्याचार केले होते. यानंतर आता त्यांचा फोनही हिसकावण्यात आला होता. यानंतर आता ज्यावेळी रिदॉय जखमी झाला तेव्हा त्याला एका रिक्षातून नजीक असलेल्या लष्करी छावणीत पाठवण्यात आले होते. येथे सैनिकांनी रिदॉय आणि त्याच्या चुलत भावाला वेगळ्या ठिकाणी दाखल केले गेले. 
 
रिदॉयचीही लष्करी छावणीत चौकशी करण्यात आली. येथून त्यांना रुग्णलायत नेण्यात आले. त्याला उपचारासाठी आणले गेले. त्यावेळी त्याच्या शरीरावर मारहाण केलेल्या खुणा असल्याचे रुग्णालायातील डॉक्टरांनी सांगितले होते. रिदॉयला रुग्णालयात दाखल केल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला होता.
 
सैनिकांना रिदॉयच्या कुटुंबाला फोन करुन त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. याउलट भारतात कट्टरपंथी युवक हिंदू युवतींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवत हिंदू युवतींना लव्ह जिहादाचा सामना करावा लागतो. मात्र एका जरी हिंदू युवकाने कट्टरपंथी युवतीसोबत प्रेम विवाह केला तर ती व्यक्ती जिवंत राहत नाही. तिच प्रचिती आता बांगलादेशातून समोर आली आहे.