पर्यावरणीय समस्यांची उकल इंटलॅक्चुअल दृष्टिकोनातूनही करा - डाॅ. जेन गुडाल

    17-Nov-2024
Total Views |
jane goodall



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - "
वातावरणीय बदलामुळे जगासमोर निर्माण झालेल्या समस्यांचे निरसन हे इंटलिजन्स वापरून नाही, तर इंटलॅक्चुअल दृष्टिकोन ठेवून करणे आवश्यक आहे", असे मत जेष्ठ वन्यजीव संवर्धक, संशोधक आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीदूत डाॅ. जेन गुडाल यांनी मांडले. त्या शनिवार दि. १६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित ‘ओशन लिस्ट्रसी डायलाॅग’ या कार्यक्रमात बोलत होत्या. ‘जेन गुडाल इन्स्टीट्यूट-इंडिया’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘होप ग्लोबल टूर’अंतर्गत गुडाला या पाच दिवसीय मुंबई दौर्यावर आल्या आहेत.
 
 
डाॅ. जेन गुडाल या ज्येष्ठ वन्यजीव संशोधिका असून ‘प्रायमेट’ म्हणजेच वानर कुळातील प्राण्यांवर केलेल्या अभ्यासासाठी त्या प्रसिद्ध आहेत. विशेष करून आफ्रिकेत चिम्पाझीविषयी केलेल्या संवर्धन आणि संशोधन कार्यासाठी त्या जगप्रसिद्ध आहेत. २००२ साली संयुक्त राष्ट्र परिषदेने त्यांच्या नावाची घोषणा शांतीदूत म्हणून केली. ९० वर्षीय गुडाल या १६ नोव्हेंबरपासून मुंबईच्या दौऱ्यावर आल्या आहेत. २० नोव्हेंबरपर्यंत त्या मुंबईत निरनिरीळ्या ठिकाणी सावर्जनिक सभांमध्ये मार्गदर्शन करणार असून काही ठिकाणी भेट देखील देणार आहेत. ‘जेन गुडाल इन्स्टीट्यूट-इंडिया’ने शुक्रवारी आयोजित केलेल्या ‘ओशन लिस्ट्रसी डायलाॅग’ या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपला जीवनकाळ उलगडला.
 
 
“मी १९५७ साली केनियामध्ये गेली. परंतु, केनियाला जाण्यासाठी मी बराच संघर्ष केला. त्याकाळी विमानप्रवास हा बोटप्रवासापेक्षा फार खर्चिक होता. केनियाच्या प्रवासाकरिता पैसे गोळा करण्यासाठी मी एका उपहारगृहात वर्षभर मदतनीस म्हणून काम केले. केनियात मला प्राणिसृष्टीची पहिल्यांदाच ओळख झाली. जंगलतोडीमुळे तिथल्या चिम्पाझींची संख्या कमी होत असल्याचे माझ्या लक्षात आहे. लुई लिकी यांच्या सांगण्यावरून मी १९६० साली या प्राण्यावर संशोधनाचे काम सुरू केले”, असे गुडाल यांनी सांगितले. “सध्या जगासमोर अनेक पर्यावरणीय समस्या आहेत. त्या वातावरणीय बदलामुळे निर्माण झालेल्या आहेत. या समस्यांविषयी केवळ बोलण्यापेक्षा त्यावर उपाय सुचविणे आवश्यक आहे. माणूस इंटलिजन्ट आहे. परंतु, चिम्पाजी हा इंटलॅक्चुअल आहे. त्यामुळे माणसांनी जगासमोर उभ्या असणाऱ्या समस्यांचे निसरन हे इंटलिजन्स वापरून नाही, तर इंटलॅक्चुअल दृष्टिकोन ठेवून करणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन गुडाल यांनी केले. केनियाच्या प्रवासादरम्यान मला समुद्राचे विराट दर्शन झाले. आजवर ‘जेन गुडाल इन्स्टीट्यूट’ला जंगलासंबंधी केलेल्या कामासाठी ओळखले जाते. परंतु, आता आम्ही समुद्रासंबंधी कामाला सुरूवात केली असून ‘ओशन लिस्ट्रसी डायलाॅग-इंडिया’ हा त्यामधीच एक भाग असल्याची माहिती गुडाल यांनी दिली.
गुडाल यांचे कार्यक्रम
- १७ नोव्हेंबर: नरिमन पाॅईंट येथील ‘एनसीपीए’मध्ये आयोजित ‘टाटा लिस्ट्रेचर लाईव्ह’ या महोत्सवाच्या सांगता संभारभात ‘रिझन फाॅर होप’ या विषयावर भाषण.
 
- १८ नोव्हेंबर: गोदरेज उद्योग समूह आयोजित ‘रूट ॲण्ड शूट’ या उपक्रमाअतंर्गत  समाजात बदल घडवू पाहणार्या होतकरू तरुणांना मार्गदर्शन.
 
 
- १९ नोव्हेंबरः बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट आणि वनकर्मचार्यांसोबत संवाद