ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेचा संजय केळकरांना पाठिंबा

    16-Nov-2024
Total Views |
 
sk
 
ठाणे : (Thane) ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेने संजय केळकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांमार्फत केळकर यांचा घरोघरी प्रचार करुन भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मदत करणार असल्याचे वृत्तपत्र विक्रेता सेनेने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
 
स्वच्छ, निष्कलंक उमेदवार असलेल्या संजय केळकर यांचा प्रत्येक ठाणेकराला अभिमान असून त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे, ते आमदार असून सुद्धा सर्वसामान्य माणसाला वेळ देतात, कुठलीही अडवणूक न करता प्रत्येकाची समस्या मार्गी लावतात. तसेच कुठलाही बडेजाव नसणारे असे हे व्यक्तिमत्व आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही केळकर यांनी अनेकवेळा सहकार्य केले आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ व्हावे, याबबत केळकरांनी सातत्याने विधानसभेत आवाज उठवल्याने ती मागणी महायुती सरकारने मान्य केली आहे. अशा व्यक्तिमत्वाला ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेने संपूर्ण पाठिंबा जाहिर केला आहे.
 
ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना अध्यक्ष विष्णू सावंत, सरचिटणीस संतोष विचारे, दीपक सोंडकर, चेतन चाळके, सचिन सावंत, दिनेश रौनक यांच्यासोबत ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे आदी उपस्थित होते.