व्होट जिहादप्रकरणी १२५ कोटी रुपयांची गुजरात-महाराष्ट्रात छापेमारी

    15-Nov-2024
Total Views |
 
vote jihad
 
नवी दिल्ली : व्होट जिहादच्या (vote jihad) आरोपानंतर अंमलबाजावणी करत ईडीने महाराष्ट्र आणि गुजरात येथे छापे टाकले आहेत. राज्यातील एका कट्टरपंथी मुस्लिम व्यवसायिकावर १२५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपानंतर हा छापा टाकण्यात आला आहे. या व्यवसायिकाने अनेक लोकांचे बँक खाते घेऊन हा व्यवहार केला होता. हा पैसा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्होट जिहादसाठी वापरला जात असल्याचा आरोप आता भाजपने केला होता.
 
याप्रकरणी गुरूवारी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र आणि गुजरात येथे छापे टाकले आहेत. राज्यातील मुंबई आणि मालेगाव येथे ईडीची छापेमारी करण्यात आली होती. याशिवाय गुजरात येथील अहमदाबाद येथे छापे टाकले आहेत. मालेगावचे व्यापारी सिराज अहमदने केलेल्या १०० कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी हवाला देण्यात आला आहे. यामध्ये काही व्यवसायिकांचा सहभाग असल्याचा संशय आहे.
 
ईडीने आपल्या तपासाची व्याप्ती राज्यातील मालेगावपासून उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, ओडिशा आणि प.बंगालसह उर्वरित देशभरात वाढवली आहे. ईडीने २५०० हून अधिक व्यवहारांची चौकशी करत आहे. देशातील १७० शाखांमध्ये होणाऱ्या व्यवहारांची चौकशी करत आहे.
 
एजन्सीला संशय आला की, ज्या लोकांच्या खात्यातून सिराज अहमदने पैसे घेतले होते. त्याचा मनी लॉन्ड्रिंगशी संबंध आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या पैशाचा वापर कोणत्या ठिकाणाहून आला? याचा तपास करत आहे. याबाबत भाजपने त्यांच्यावर व्होट जिहादचा आरोप केला आहे.