डोमिनिका देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर
14-Nov-2024
Total Views |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत देश प्रगतीची नवनवीन शिखरं गाठत असतानाच, भारताच्या शिरपेचात अजून एक मनाचा तोरा खोवला गेला आहे. डोमिनिका या देशाचा सर्वोच्च सन्मान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे. कोव्हीड काळात ज्या वेळेस महामारीचे तांडव सुरू होते, त्या वेळेस भारतीयांच्या रक्षणासाठीच नव्हे, जगाच्या पाठीवर लोकांना वैक्सीन पोहोचवण्याचे कार्यकेल्याबद्दल मोदींचा सन्मान केला जातो आहे.
डोमिनिका देशाच्या पंतप्रधनांच्या कार्यालयाने या बद्दल माध्यमांना अधिकची माहिती दिली त्यात ते म्हणाले " कॉमनवेल्थ डोमिनिका या देशाचा सर्वेच्च पुरस्कार आम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करणार आहोत. कोव्हीड महामारीच्या काळात डोमिनिका या देशासाठी केलेल्या योगदानाबद्दल, आणि भारत - डोमिनिका या देशांचे संबंध सुधराण्यात मोलाचे काम केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे. २०२१ साली फेब्रुवारी महिन्यात ७०,००० एस्ट्राझेनेका कोव्हीड लसींचा साठा भारताकडून डोमेनिका देशाला देण्यात आला. येत्या १९ ते २१ नोव्हेंबर मध्ये गुयाना या दक्षिण अमेरीकेच्या देशात भारत -कॅरीकॉम परिषद भरणार आहे. या परिषदेच्या दरम्यान, डोमिनिका देशाचे राष्ट्रपती सिल्व्हनी बर्टन यांच्या हस्ते हा बहुमान मोदींना प्रदान करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आरोग्यसेवा, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानामध्ये डॉमिनिकाला भारताने दिलेला पाठिंबा तसेच जागतिक स्तरावर शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सुरू केलेले उपक्रम व आपल्या कार्यप्रणाली मध्ये घेतलेल्या त्यांच्या भूमिकेलासुद्धा पुरस्कार दिला जातो.