मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या २०१९ सालच्या जाहीरनाम्यात मतदारांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता त्या आश्वासांनीची पोलखोल झाली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी एकूण १० मागण्या केल्या होत्या मात्र त्यापैकी एकही मागण्या केल्या नसल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे.
उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली केलेल्या जाहीरनाम्यापैकी पहिला जाहीरनामा :
मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार.
प्रत्येक जिल्ह्यात महिला बचतगटासाठी एक भवन तयार करण्यात येणार.
तालुकास्तरावर खुली व्यायामशाळा सुरू करणार.
शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रूपये देण्याचे आश्वासन.
गाव पातळीवर गाव ते शाळा सुरू करून विद्यार्थी एक्सप्रेस २५०० बस
मात्र, वरीलपैकी कोणत्याही जाहीरनाम्याची अंमलबजावणी उद्धव ठाकरे सरकारने २०१९ मध्ये केली नाही. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या जाहीरनाम्याची फेरा फेरी नव्याने समोर आली आहे. त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.