आव्हाडांविरोधात धनंजय मुंडेंचा हल्लाबोल!

मुंब्यातील जाहिर सभेत नजीबभाईला विजयी करण्याचे आवाहन

    13-Nov-2024
Total Views |
Dhananjay Munde

ठाणे : कळवा मुंब्र्यातील विधानसभा निवडणुकीतील ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची लढाई आहे, सत्य-असत्याची लढाई आहे, धर्म-अधर्माची लढाई आहे, नजीबभाईंची लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे. असा हल्लाबोल करीत राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगितले. येत्या २० तारखेला घड्याळासमोरील बटन दाबण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.

मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ शमशाद नगर, मुंब्रा येथे ना. मुंडे यांची जाहीरसभा मंगळवारी पार पडली.या जाहीरसभेला महिलांची संख्या लक्षणीय उपस्थिती होती.जे स्वतःला लोकांपेक्षा मोठे समजतात, भगवान, ईश्वर, अल्लापेक्षाही मोठे समजतात त्यांना त्यांची जागा दाखवायची हीच योग्य वेळ आहे.कळवा मुंब्र्याची ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची लढाई आहे, सत्य-असत्याची लढाई आहे, धर्म-अधर्माची लढाई आहे, नजीबभाईंची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे. जितेंद्र आव्हाड हा माणूस दुतोंडी आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाजप बरोबर जाण्यासाठी पत्रकावर सही केली होती. सही करताना विधान परिषदेची मागणीही आव्हाड यांनी केली होती. पण नंतर दादाच्या भितीने सही केली अशी पलटी मारली. लाडक्या बहिणींना महायुती सरकारने मासिक १५०० मानधन सुरु केल्यावर त्याविरोधात बोलणारे महाविकास आघाडीने आता महिलांना तीन हजार रुपये देम्याचे जाहीर केले आहे.पण ज्या कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश येथून ही कल्पना आणली तेथील निवडणूका संपल्यावर तीन हजार रुपये देण्याची योजना बंद झाली आहे.महाराष्ट्रतही माताभगिनींची महाविकास आघाडीकडून अशीच फसवणूक होवू शकते. असा आरोप मुंडे यांनी केला.

जितेंद्र आव्हाड म्हणतात मला निवडून द्या, मी महिन्याभरात टोरन्ट पॉवर घालवतो. मंत्री, आमदार असताना टोरन्ट का घालवले नाही ? उलट टोरन्टला चार्ज देतानाचा व्हिडिओ सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. मुंब्रा कळव्यातील मतदारांच्या मतांवर आमदार होऊनही थोड्याश्या पैशासाठी मतदारांचे पाकिट मारुन आव्हाड यांनी स्वतःचे घर भरले आहे. यामुळेच टोरन्ट पाॅवर हटविण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन नजीब मुल्ला यांनी केले.