मुंबई : किरण राव दिग्दर्शित आणि आमिर खान निर्मित लापता लेडीज या चित्रपटाने ऑस्करपर्यंतची मजल मारली. अगदी हलकी फुलकी कथा, प्रभावी संवाद आणि नवोदित कलाकारांच्या अभिनयाने चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. याच कारणामुळे भारताकडून या चित्रपटाची निवड ऑस्कर २०२४ साठी करण्यात आली. दरम्यान, भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असून नव्या नावाचे पोस्टर देखील प्रदर्शित केले आहे.
या चित्रपटाचे नाव '
लापता लेडीज' ऐवजी 'लॉस्ट लेडीज' असे करण्यात आले आहे. ' ‘लॉस्ट लेडीज' या नावाने चित्रपट अॅकॅडमी अवॉर्ड्सकडे पाठवण्यात आला असून किरण राव आणि आमिर खान यांनी नुकतंच न्यूयॉर्क शहरातही चित्रपटाचं प्रमोशन केलं.
'लापता लेडीज' चित्रपट १ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव आणि रवी किशन यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. तसेच, छाया कदम या मराठमोळ्या अभिनेत्रीनेही उत्तम भूमिका साकारली आहे.