महाराष्ट्र : भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन तसेच विधी व न्याय फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमाला व स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला .सदर कार्यक्रमची सुरुवात दीप प्रज्वलित करत छत्रपती शिवाजी महाराज ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पित करून झाली. तदनंतर प्रस्तावनेत विधी व न्याय फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड.मंगेश खराबे यांनी फौंडेशनची माहिती दिली व प्रमुख वक्ते ॲड.गणेश शिरसाट सरांनी''केशवानंद भारती केस- द अनटोल्ड स्टोरी'' या विषयावर प्रभावी व्याख्यान देत भारतीय संविधानाच्या स्थैर्याचे महत्त्व अधोरेखित केले.
मोशी येथे होणारे संविधान भवन हे भारतातील पहिले असे केंद्र असणार आहे, जे भारतीय संविधानाच्या महत्वाला समर्पित आहे. मोशी पेठ क्र. १४ मधील न्यायसंकुलाच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर,भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नांमुळे मोशी येथे पेठ क्र.११ मध्ये संविधान भवन देखील उभे राहणार असून त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या स्नेह मेळाव्यात न्यायसंकुल व संविधान भवनाचे प्रेझेन्टेशन करण्यात आले. या सोहळ्याला महेश दादांचे बंधू श्री. कार्तिक लांडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. वकील संघटनेचे आजी-माजी अध्यक्ष, बहुसंख्य वकील बंधू- भगिनी तसेच विधी क्षेत्रातील विद्यार्थी देखील उपस्थितीत होते. हा सोहळा संविधानाच्या गौरवाची साक्ष देणारा ठरला!"
संविधान भवनाचे उभारणीसाठीची पावले आणि नव्या पिढीला प्रेरणादायी मार्गदर्शन - एक ऐतिहासिक क्षण, एक ऐतिहासिक दिशा!"
मोशीतील प्रस्तावित संविधान भवन आणि त्यामधील डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी, शहरातील वकील बांधवांसाठी तसेच नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध होणार आहे.आमदार महेशदादा लांडगे यांच्या दूरदृष्टीमुळे या सुविधेच्या उभारणीला चालना मिळाली आहे. ज्यामुळे नवी पिढी भारतीय संविधान, न्यायव्यवस्था आणि कायदा यांचे महत्व समजून घेण्यास सक्षम होईल. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. कार्यक्रमाचे आयोजन विधी व न्याय फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड मंगेश खराबे व कार्याध्यक्ष ॲड विशाल डोंगरे यांनी केले.