दहिसरमध्ये दीड कोटींचे सोने जप्त!

    12-Nov-2024
Total Views | 29
Dahisar

मुंबई : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, दहिसरमध्ये ( Dahisar ) तब्बल दोन किलो सोने जप्त करण्यात आले आहे. त्याचे बाजारमूल्य सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे.

केंद्रीय खर्च निरीक्षक सौरभ कुमार शर्मा, निवडणूक निर्णय अधिकारी शीतल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित तपासणीदरम्यान अवधूतनगर-दहिसर पश्चिम येथे ही कारवाई करण्यात आली. यतीन धोंडेकर यांच्या नेतृत्वाखालील स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ९ ने १.४३ कोटीचे १.९५ किलो इतके बेहिशेबी सोने जप्त केले. मौल्यवान धातू आणि बेहिशेबी रोकड यांची अनधिकृत हालचाल रोखण्याच्या उद्देशाने नियमित पाळत ठेवण्याच्या उपायांपैकी एक भाग म्हणून ही जप्ती करण्यात आली. ही जप्ती निवडणुकीच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकू शकणार्‍या रोख नगद, मौल्यवान धातू आणि मद्य यांच्या बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण ठरते.

अग्रलेख
जरुर वाचा
पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातीलअस्नोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पोटच्या तीन सख्ख्या मुलींना विष घालून हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. काव्या (वय १०), दिव्या (वय ८) आणि गार्गी भेरे (वय ५) अशी मृत झालेल्या मुलींची नावे असून, संध्या संदीप भेरे (रा. चेरपोली) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलींच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आईला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121