हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या,राजपाल यादवचा माफीनामा

    01-Nov-2024
Total Views |

rajpal yadav  
 
 
 
मुंबई : अभिनेते राजपाल यादव यांच्या सोशल मिडियावरुन काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ज्यात त्यांनी हिंदु समाजाला दिवाळीत फटाके न उडवण्याचा सल्ला दिला होता. यात त्यांनी असं देखील म्हटलं होतं की फटाक्याच्या आवाजामुळे प्राणी घाबरतात;त्यामुळे हिंदुंनी फटाके उडवणं टाळलं पाहिजे. पण त्यांच्या या व्हिडिओनंतर त्याना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.दरम्यान, आता राजपाल यादव यांनी सर्व हिंदु समाजाची जाहिर माफी मागितली आहे.
 
राजपाल यादव यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, "नमस्कार, सगळ्यांना सर्वात आधी दिवाळीच्या खुप शुभेच्छा. दोन दिवसांपूर्वी माझ्या सोशल मिडियावरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. तो व्हिडिओ मी ताबडतोब डिलिट केला आहे. आणि त्या व्हिडिओमुळे देशभरातली आणि जगभरातील कुठल्याही व्यक्तीच्या भावना दु:खावल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद. जय भारत!".
 
 
 
दरम्यान,राजपाल यांनी हिंदुंना दिवाळीबद्दल दिलेल्या सल्ल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले होते. शिवाय त्यांच्या या वक्तव्यानंतर ख्रिस्ती पॅस्टर यांच्यासोबत चिकन बिर्याणीच्या जाहिरातीत झळकले होते; ज्यात बिर्याणी बाय किलो साठी त्यांनी ही जाहिरात केली होती. पण त्यांनी हिंदुंच्या भावना दु:खावल्यामुळे लोकांनी त्यांना या जाहिरातीतून त्यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करुन दिली होती.