अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती!; व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

    01-Nov-2024
Total Views |
 
amruta khanwilkar
 
 
मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकर हिने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तिच्या चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. अमृताने मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपली ओळख निर्माण केली आहे. आता तिने नवं घर घेत आणखी एक मजल मारली आहे. अमृताने तिच्या घराची पहिली झलक सोशल मिडियावर शेअर केली आहे.
 
अभिनेत्री अमृता खानविलकर हिने इंस्टाग्रामवर घराचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “चला भेट झालीच आपली कधी काळी दूर कुठेतरी तुझं स्वप्न पाहिलं होतं, आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न रोज सुरू होता. तर ही आपली पहिली दिवाळी….तुला खूप गोष्टी सांगायच्या आहेत, मला काय आवडतं, काय नाही, मनातलं गुपित, शांततेतलं ….सारं काही हळूहळू तुला कळेलच. तुलाही मला खूप काही सांगायचं असेल…माझी पूर्ण तयारी आहे”.
 

amruta khanwilkar 
 
 
तिने पुढे लिहिले आहे की, “तू अजून हळूहळू आकार घेतोयस, तुझ्या कानाकोपऱ्यात मी माझं सगळं जग बसवायचा प्रयत्न करतेय. तू ही अगदी माझ्या हो ला हो म्हणतोयस…. आवडतंय मला….. लवकरच भेटू नव्या कोऱ्या भिंतींसह नव्या आठवणी बनवण्यासाठी नवं आयुष्य उलगडण्यासाठी. दिवाळीच्या शुभेच्छा. ''माझ्यासाठी ही आनंदाची दिवाळी'' लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने आणि नोव्हेंबरमध्ये माझा वाढदिवसाचा महिन्याच्या माझ्या नवीन घराची बातमी सांगताना मी अगदी नम्र आणि उत्सुक आहे “एकम” म्हणजे सुरुवात आणि ती खरोखरच प्रत्येक अर्थाने आहे. माझ्यासाठी ही खरोखरच खूप आनंदाची दिवाळी आहे”, असे अमृताने पोस्टमध्ये म्हटले आहे.