"भाजपशी थेट लढाई असली की, काँग्रेस..."; हरियाणातील निकालानंतर खासदार प्रियंका चतुर्वेदींची टीका
09-Oct-2024
Total Views |
मुंबई : भाजपशी थेट लढाई असली की, काँग्रेस कमकूवत होते, अशी टीका उबाठा गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. हरियाणामध्ये काँग्रेसच जिंकणार असं वातावरण निर्माण केलेलं असताना भाजपने हॅट्रिक मिळवली. यावरून आता मविआतील मित्रपक्षांकडून काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे.
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, "इतकी अँटी इन्कबंन्सी असूनही भाजपचे सरकार बनत असेल त्यांचे अभिनंदन आहे. भाजपने हरियाणातील जनतेचा विश्वास जिंकला आणि ते बनवून ठेवला. काँग्रेस पक्षानेही आपल्या रणनीतीबद्दल विचार करावा लागेल. भाजपसोबत थेट लढत असल्यावर काँग्रेस कमजोर पडते," असे त्या म्हणाल्या.
तसेच संजय राऊतांनी काँग्रेसवर टीका केली आहे. हरियाणाचा पराभव हा दुर्दैवी आहे. आम्ही एकतर्फी जिंकू, आम्हाला कुणाची गरज नाही, असं काँग्रेसला वाटलं. जिथे काँग्रेस कमजोर असते तिथे ते प्रादेशिक पक्षांची मदत घेतात आणि जिथे त्यांना वाटतं की, आपण मजबूत आहोत तिथे ते स्थानिक पक्षांना महत्व देत नाहीत. या सगळ्याचा परिणाम हरियाणासारखा निकालावर होतो," असे ते म्हणाले.