कट्टरपंथींनी गाझियाबादच्या डासना मंदिराला घेरले

स्थानिक आमदारांनी योगी आदित्यनाथ यांना लिहिले पत्र

    09-Oct-2024
Total Views |
 
Dasna Temple
 
गाझियाबाद : इस्लामिक कट्टरपंथीयांच्या जमावाने गाझियाबाद येथे डासना मंदिराला (Dasna Temple) घेराव घातला होता ही घटना ४ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली असल्याचा दावा आहे. एका प्रसारमाध्यमाच्या रिपोर्टनुसार, मुस्लिम समितीच्या बैठकीत वडिलधाऱ्यांना पाठवण्यात आले होते. त्यानंतर आता दुसरीकडे मुस्लिम सैनिकांना डासना मंदिराकडे पाठवण्यात आले. त्यावेळी हिंदू धर्मांच्या मंदिरावर झालेल्या हल्ल्यामागे कोणत्या तरी समाजकंटकांचा हात असल्याची शक्यता आहे.
 
नंदा किशोर गुर्जर यांनी सोमवारी ७ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले होते. त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शुक्रवारी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी एका मुस्लिम जमावाने मंदिरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर देशभरातील हिंदू समाजात संतापाची लाट आहे. त्यांनी याप्रकरणात बाहेरील काही घटकांचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, विरोधी पक्ष, विशेषत: काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि एमआयएम पक्षाच्या संबंधितांनी हा हिंसाचार केला आहे.
 
 
 
बाहेरील देशात सहभागाचे वर्णन करताना, भाजप आमदाराने यामागे विरोधी पक्षांचे हे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी डासना मंदिराचे पौराणिक महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, भगवान परशुराम आणि पांडवांनी याठिकाणी तपश्चर्या केली होती. भाजप आमदारांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी तत्परता दाखवत मंदिर आणि त्यात उपस्थित असलेल्या मूर्ती नष्ट होण्यापासून तर वाचल्याच पण आता उपस्थित असललेल्या अनेक भाविकांचे प्राणही वाचवले.
 
त्यावेळी त्यांनी सर तनसे जूदा असा नारा देणाऱ्यांना चपराक लगावली आहे. ते म्हणाले की देशात काँग्रेस तालिबानी राजवट आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार आरोप दाखल करण्यात आले आहेत.