प्राईस बँड निश्चित! 'या' तारखेला येणार आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO?

    08-Oct-2024
Total Views |
biggest upcoming ipo in market soon


मुंबई :      देशातला सर्वात मोठा आयपीओ(IPO)मध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. ह्युंदाई कंपनीने आयपीओकरिता प्राईस बँड जाहीर केला असून १,८६५-१,९६० रुपये प्रति शेअर असू शकतो. ह्युंदाई कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात लाँच होणार असून गुंतवणूक करण्याची प्रतीक्षा संपलेली आहे. अद्याप कंपनीकडून अधिकृत माहिती प्रसिध्द करण्यात आलेली नाही. 


हे वाचलंत का? -     गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ऑटोमोबाईल कंपनीने 'तो' निर्णय घेतला मागे


दरम्यान, ह्युंदाईने आयपीओच्या माध्यमातून एलआयसीचा रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. कंपनी आयपीओ सूचीबध्द होण्याचा कालावधी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान असेल. कंपनी दि. १४ ऑक्टोबर रोजी आयपीओ लाँच करु शकते. आयपीओत गुंतवणूक करु इच्छिणाऱ्यांसाठी लवकरच संधी उपलब्ध होणार आहे.

ह्युंदाई मोटर्स कंपनीने १,८६५ ते १,९६० रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केला जाऊ शकतो. आयपीओ १४ ऑक्टोबर रोजी मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. दि. १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान किरकोळ आणि इतर श्रेणींमधून बोली लावल्या जातील. २२ ऑक्टोबर रोजी कंपनी सूचीबध्द होऊ शकते. म्हणजेच या तारखेपासून शेअर बाजारात व्यवहार सुरू होतील.


एलआयसीचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता

भारतातील सर्वात मोठा आयपीओ म्हणून ह्युंदाई कंपनीकेड पाहिले जाईल. याआधी एलआयसीने आयपीओ लाँच करून विक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर आता ऑटो क्षेत्रातील कंपनीने २५,००० कोटी रुपयांचा आयपीओ घेऊन येत आहे. तथापि, आयपीओ उघडण्याची तारीख आणि किंमत बँडबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, बाजारातील तज्ज्ञांकडून विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.