चंदीगड : हरियाणा तसेच जम्मू आणि काश्मीर विधानसभेचा निकाल पुढे येत आहे. दरम्यान, हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून कुस्तीपटू विनेश फोगाट या विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
जुलाना मतदारसंघात काँग्रेसच्या विनेश फोगाट यांनी भाजपच्या योगेश बैरागी यांचा पराभव केला आहे. जवळपास ५ हजार मतांनी त्यांनी विजय मिळवला. विनेश फोगाट यांनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरी गाठली असताना त्यांना पराभव पत्करावा लागला होता. १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने त्यांना अंतिम फेरीतून बाद करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी कुस्ती सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि विधानसभेची निवडणूक लढवली.