महाराष्ट्रातील बुलेट ट्रॅक उभारणीसाठी निविदा

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे महाराष्ट्रातील कामे वेगात

    08-Oct-2024
Total Views |

NHSRCL
मुंबई, दि.८ : प्रतिनिधी एनएचएसआरसीएलने महाराष्ट्र राज्यात 'डबल लाइन हाय स्पीड रेल्वेसाठी चाचणी आणि कमिशनिंगसह ट्रॅक आणि ट्रॅकसंबंधित कामांचे डिझाइन, पुरवठा आणि बांधकाम' साठी पात्र भारतीय आणि जपानी कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. मुंबई बुलेट ट्रेन स्थानक ते महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील झारोली गाव या दरम्यान सुमारे १५७ किमी म्हणजेच ३१४ किमी लांबीच्या ट्रॅकची संपूर्ण आखणी करण्यात आली आहे. यात ठाण्यातील 4 स्थानके आणि रोलिंग स्टॉक डेपोच्या ट्रॅकच्या कामांचाही समावेश आहे.
जपानी एचएसआर (शिंकानसेन) मध्ये वापरली जाणारी गिट्टीरहित स्लॅब ट्रॅक प्रणाली भारताच्या पहिल्या एचएसआर प्रकल्पावर (एमएएचएसआर) वापरली जाईल. जनरल कन्सल्टंट म्हणून जेआयसीसीने करारासाठी आरसी ट्रॅक बेड, ट्रॅक स्लॅब व्यवस्था इत्यादी प्रमुख एचएसआर ट्रॅक घटकांचे तपशीलवार डिझाइन आणि ड्रॉइंग प्रदान केले आहे. एनएचएसआरसीएल आणि जपान रेल्वे टेक्निकल सर्व्हिस (जेएआरटी) यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार(एमओयू) जेआरटीएस मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरसाठी (टी-1 पॅकेजसह) ट्रॅक वर्कच्या बांधकामासाठी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र आणि सल्लागार सेवा प्रदान करेल. टी-२ आणि टी-३ पॅकेजेससाठी जपानी प्रशिक्षकांकडून भारतीय अभियंत्यांना ट्रॅक ट्रेनिंग फॅसिलिटी (टीटीएफ) सुरत येथे अनेक प्रशिक्षण अभ्यासक्रम यापूर्वीच पूर्ण झाले आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे हे शेवटचे ट्रॅक बांधकाम कंत्राट असेल. पॅकेज टी-२ आणि टी-३ अंतर्गत गुजरातमध्ये ट्रॅक बांधणीचे काम सुरू झाले आहे. गुजरातमधील दोन्ही ट्रॅक वर्कची कंत्राटे भारतीय कंपन्यांना देण्यात आली आहेत. तांत्रिक निविदा ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी उघडण्यात येणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असल्याचा आरोप, तिरुपती मंदिर प्रशासनाकडून अधिकाऱ्याचं निलंबन

चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असल्याचा आरोप, तिरुपती मंदिर प्रशासनाकडून अधिकाऱ्याचं निलंबन

(Tirupati Balaji Mandir) आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिरातील एका अधिकाऱ्यावर तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) प्रशासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. ए राजाशेखर बाबू असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सहाय्यक कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. चर्चमधील प्रार्थनेमध्ये उपस्थित राहत ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार करण्यात सहभागी होत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती देवस्थान प्रशासनाने त्यांना निलंबित केले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121