सोने ८० हजार पार जाणार?; ग्राहकांचा गुंतवणुकीकडे कल, आजचा भाव जाणून घ्या

    07-Oct-2024
Total Views |
gold-price-today-gold-price-investment-approach


मुंबई :       इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होताना दिसून येत आहे. विशेषतः गुंतवणूकदारांच्या मनात धाकधूक वाढली असून सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. जगापेक्षा भारतात सोने खरेदी करणारा वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे भारतीय नागरिक सोन्यात गुंतवणूक करण्यास सरसावले आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.




दरम्यान, सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणजे सोने. त्यामुळे वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी हीच गुंतवणूक फायदेशीर ठरते. परिणामी, गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. त्यात आता मध्य-पूर्वेतील संघर्ष यामुळे तेलाच्या किमतीसह सोन्याच्या भाव वधारण्याची तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सोन्याचे भाव ८० हजारांच्या पार जाणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
 
त्याचबरोबर, भारतीय शेअर बाजारात पडझडीचे सत्र सुरू असताना अन्यत्र गुंतवणूक करण्यासाठी पर्याय शोधले जात आहेत. सद्यस्थितीस सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले असून चांदी(९३,४८० रुपये प्रति किलो)च्या मागणीत देखील मोठी वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,१०० रुपये इतका असून २४ कॅरेटचा भाव ७५,७१० रुपये आहे. पुढील वर्षात सोन्याचा भाव प्रतितोळा ८०,००० रुपये जाण्याची शक्यता बाजार विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.