हिंदूवर गोळीबार ! त्रिपुरा येथे नवरात्रौत्सवाला गालबोट

    07-Oct-2024
Total Views |
 
Injustice against Hindus
 
त्रिपुरा : भारतातील ईशान्य भागातातील त्रिपुरा येथे जातीय ताणावाची नोंद झाली आहे. काही समाजकंटकांनी हिंदू घरांवर गोळीबार केला आणि घरे जाळून टाकण्याचे हैवानी कृत्य केले आहे. या सुरू असलेल्या हिंसाचारात हिंदूंवर हिंसाचार करण्यात आले आहेत. तर दोघेजण जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना रविवारी ९ ऑगस्ट २०२४ रोजी घडली आहे.
 
प्रसारमाध्यमानुसार, ही घटना त्रिपुरा जिल्ह्यातील कदमताला मार्केटमधील आहे. येथे रविवारी हिंदू समाजातील काही लोकं दुर्गापूजेसाठी रस्त्यावर वर्गणी मागत होते. त्यावेळी त्यांचा एका मुस्लिम चालकासोबत वाद झाला. त्याचे नंतर वादात रूपांतर झाले असून काही वेळातच उपस्थित असलेला मुस्लिमबहुल जमाव त्याठिकाणी आला. त्यावेळी जमावाच्या हातात काठ्या आणि हत्यारे होती. त्यांनी देणगी मागणाऱ्या हिंदूंवर हल्ला केला तसेच आसपासच्या रहिवांशांवरही हल्ला केला.
 
 
 
यावेळी हिंदू महिलांसोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. दुकानेही लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हिंसाचारात अनेक घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. मात्र त्यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने पोलिसांना लक्ष केले. या हल्ल्यात काही पोलीस जखमीही झाले आहेत. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या व्हिडिओत गोळीबार केल्याचा आवाज ऐकू येत आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे.
 
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला होता. यावेळी जखमींनी रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रतिबंधात्मक आदेश म्हणून तणाव परिस्थिती ठिकाणी असलेल्या भागात भारतीय न्यायसंहिता कलम १६३ लागू करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी पुढील तपास सुरू असून लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.