नागपूरमध्ये पेरनोड रिकार्ड इंडियाची मोठी गुंतवणूक! ९० हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

    07-Oct-2024
Total Views | 107
 
Fadanvis
 
नागपूर : नागपूरमध्ये पेरनोड रिकार्ड इंडियाच्या आशियातील सर्वात मोठ्या मॉल्ट डिस्टिलरी आणि मॅच्युरेशन सुविधेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडले. या उद्योगामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पेरनोड रिकार्ड ही जगातील मोठी कंपनी आहे. या कंपनीने आशियातील सर्वात मोठी डिस्टिलरी नागपूरमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्याचे भूमिपूजन संपन्न झाले. या कंपनीला ९० हजार शेतकऱ्यांकडून कच्चा माल घ्यायचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक खात्रीलायक भाव आणि मार्केट मिळेल. नागपूर आणि विदर्भातील शेतकऱ्यांना मदत करणारा हा उद्योग आहे."
 
हे वाचलंत का? -  हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी! नाराज नेते बंड पुकारणार?
 
"याशिवाय फ्रान्सच्या पोमा कंपनीची ताडोबातील रोपवेला हवाई पर्यटनाच्या माध्यमातून वन्यजीवनाचा अनुभव देण्याची संकल्पना आहे. त्यांनी याबाबत एक पत्रही दिले आहे. लवकरच याचा अभ्यास करून आम्ही त्यांच्याशी सामंजस्य करार करू," अशी माहितीही त्यांनी दिली.
 
कोरपना अत्याचार प्रकरणाची पाळमुळं शोधून काढू!
 
चंद्रपूरमधील कोरपना येथील अत्याचार प्रकरणावर बोलताने ते म्हणाले की, "हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्याची पाळंमुळं खालपर्यंत गेलेली आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे धागेदोरे शोधून आरोपीवर कारवाई करा, अशा सक्त सुचना पोलिसांना यासंदर्भात देण्यात आल्या आहेत," असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अमेरिकेकडून ‘एण्टिफा’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित ; ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवरून ट्रम्प यांची माहिती

अमेरिकेकडून ‘एण्टिफा’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित ; ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवरून ट्रम्प यांची माहिती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एण्टिफा’ला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. ट्रम्प यांनी यास धोकादायक, अति डाव्या विचारसरणीचे आणि एण्टी-फॅसिस्ट आंदोलन असे संबोधले. काही दिवसांपूर्वी यूटा व्हॅली विद्यापीठ परिसरातील एका कार्यक्रमात ट्रम्प यांचे समर्थक आणि त्यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येचा आरोपी टायलर रॉबिन्सन याचे संबंध एण्टिफाशी असल्याचे मानले जात आहे. ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर या निर्णयाची ट्रम्प यांनी घोषणा केली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121