तिरूपती : आंध्र प्रदेशातील तिरूपती बालाजी या प्रसिद्ध असलेल्या देवस्थनात काही दिवसांआधी प्राण्यांच्या चरबीयुक्त तेलाचा वापर करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती निर्माण झाली आहे. तिरूपती मंदिरात काही भक्तांनी प्रसादात किडे आढळल्याचा आरोप केला आहे. बुधवारी दुपारी काही भक्त दर्शनासाठी आले असता त्यांच्या प्रसादात किडे आढळल्याची माहिती आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भक्त चंदू हा वारंगनहून तिरुपती येथे दर्शनासाठी आला होता. त्यावेळी त्याने दर्शन घेतले. त्यानंतर तो प्रसादासाठी गेला असता तेव्हा प्रसादामध्ये किडा सापडला होता. त्यावेळी चंदूने याप्रकरणी मंदिरातील कर्मचाऱ्याला माहिती दिली होती. त्यावेळी मंदिराच्या कर्मचाऱ्याने असे कधी कधी होते असा दावा केला होता.
याप्रकरणाची माहिती चंदूने दिली आहे. तो म्हणाला की, मी चंदू आहे मी वारंगनाहून आलो आहे. माझ्या दही भाताच्या प्रसादात किडे आढळले होते. त्यावेळी मी मंदिरातील कर्मचाऱ्यांना याबाबत सांगितले, असे एका वृत्तात माहिती देण्यात आली आहे. मात्र त्यावेळी मला आणि इतर भक्तांना मंदिरातून बाहेर काढण्यात आले अशी माहिती चंदूने दिली.