हिंदू धर्माबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करणाऱ्या हिंदू युवकास जीवे मारण्याची धमकी
06-Oct-2024
Total Views |
सुलतानपूर : उत्तर प्रदेशात सुलतानपूर जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर हिंदू धर्माबाबत एक व्हिडिओ शेअर केला होता. यासोबत त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. शाहिद कुरेशी, अयान अहमद, हसनैन आणि आणखी एकावर मारहाणीचा आरोप करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आईने याप्रकरणात पोलिसांनी बुधवारी २ ऑक्टोबर रोजी एफआरआय दाखल करण्यात आली असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हे प्रकरण सुलतानपूर जिल्ह्यातील कोतवाली नगर येथील आहे. बुधवारी अंकित तिवारीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हिंदू धर्माचे स्टेट्स टाकले. त्यामुळे त्यांच्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या काही कट्टरपंथी विद्यार्थ्यांनी संतप्त भूमिका घेतली आहे.
याप्रकरणात शाहिद, हसनैन आणि अयान अहमद यांनी अंकितला कॉलेजमध्ये पकडले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी अंकितने पळ काढला. ३० सप्टेंबर २०२४ रोजी कट्टरपंथी अनसरने त्याचा साथीदार सुजल भारतीसोबत कॉलेजमध्ये त्याला पकडले. यावेळी त्याने अंकितला मारहाण केली आणि माफी मागण्यास भाग पाडले. त्यावेळी जिहाद्यांनी अंकित माफी मागत असल्याचा व्हिडिओ बनवत शेअर केला.
आरोपींनी अंकितचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, आरोपीने तक्रार केल्यास अंकितच्या आईला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. पीडित अंकितच्या आईने आरोपीला धार्मिक कट्टरवादी गट म्हटले आहे. यावेळी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी आरोपीच्या आईने तक्रारीत दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीची दखल घेत पोलिसांनी एफआयआर दाखल केला. भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.