मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अगदीच अंतिम टप्प्यात आला आहे. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी या सीझनचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. परंतु, त्याआधी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरातून या सीझनमध्ये बाहेर गेलेल्या सदस्यांनी घरात पुन्हा एन्ट्री घेतली आहे. आजच्या भागात सर्व सदस्यांचे रियुनियन दिसणार असून यात निक्की आणि अरबाज यांची भेट विशेष लक्षवेधी असणार आहे.
अरबाज पटेल ज्यावेळी घरातून बाहेर गेला होता त्यावेळी निक्की ढसाढसा रडली होती. यानंतर घरात ‘फॅमिली वीक’ टास्क पार पडला. यावेळी घरात निक्कीचे आई-वडील आले होते. प्रमिला तांबोळी यांनी घरात आल्यावर अरबाजबद्दल लेकीसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले. यामुळेच निक्कीने अरबाजबरोबरचं नातं संपल्याचं जाहीर केलं. यावर अरबाजने यावर निक्कीशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करेन अशी प्रतिक्रिया दिली होती. अखेर या दोघांची ‘बिग बॉस’च्या घरात भेट झाली आहे.
यावेळी अरबाजने निक्कीसमोर अनेक गोष्टींबाबत स्पष्टीकरण दिलं असून निक्की म्हणाली, “तू जाताना रडला नाही, मला वाटलं खरंच तुझं बाहेर लफडं असेल म्हणून तुला फरक नाही पडला” आता निक्कीच्या प्रश्नांची अरबाज काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, घरात एन्ट्री घेतल्यावर अरबाजच्या कोटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या कोटवर निक्कीच्या तोंडातून कायम बोलला जाणारा ‘बाई’ हा शब्द बॅचच्या स्वरुपात लावण्यात आला होता. सध्या निक्कीचं ‘बाईSSS’ सर्वत्र लोकप्रिय झालं आहे. त्यामुळेच अरबाजने हा नाव लिहिलेला बॅच लावून घरात एन्ट्री घेतली आहे.
दरम्यान, रविवारी ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’चा ग्रॅंड महाअंतिम सोहळा संपन्न होणार असूनआता अभिजीत, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय आणि जान्हवी या सहा जणांमध्ये ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.