बांगलादेशात कट्टरपंथींचा रस्त्यावर उतरत दुर्गापूजेस विरोध
03-Oct-2024
Total Views |
ढाका : बांगलादेशातील हिंदूवरूद्ध हिंसाचार आणि भेदभावाच्या होत असल्याचे चित्र आहे. दुर्गापूजेच्या या उत्सवाला निषेध करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कट्टरपंथी गट रस्त्यावर उतरत दुर्गापूजेला परवानगी देणार नाही अशा घोषणा देत आहेत.
नुकतंच बांगलादेशच्या माजी पंतप्रधांन शेख हसीना यांची हकालपट्टी झाल्यानंतर बांगलादेशात कट्टरपंथी समाजकंटकांनी उन्माद केला आहे. कट्टरपंथी इस्लामी गट हिंदू समाजाविरूद्ध भडकाऊ टिप्पणी करत आहेत, घोषणा देत आहेत. ढाका महाविद्यालयात व्हायरल व्हिडिओत विद्यार्थी शरिया किंवा शहदतची मागणी करत घोषणा देत असल्याचे दिसत आहे. अनेक हिंदू व्यावसायिकांना त्याचे मत व्यक्त केल्यामुळे किंवा अतिरेकी गटांच्या कृतींना विरोध केल्यामुळे त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे.
बांगलादेशातील एका विद्यापीठातील अॅग्रीकल्चर आणि टेक्नॉलॉजी येथील हिंदू शिक्षिका श्रेष्ठा हलदर यांनी दुर्गापूजेला समर्थन केल्याबद्दल कथित त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले. तिने दुर्गापूजेचे वर्णन करण्यासाठी सार्वभैमिक शब्द वापरण्यास कट्टरपंथी गटांच्या आक्षेपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा युक्तिवाद केला होता. विद्यार्थी संघटनांच्या दबावाखाली हलदर यांना धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली बडतर्फ करण्यात आले. त्यांना बडतर्फ केल्याने समुदाय आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
विद्यार्थी गट धमक्यांसह जमात-ए-इस्लामीसारख्या कट्टरपंथी संघटना हिंदूंना विरोध न करण्याची आणि देश सोडून जाण्याची उघडपणे धमकी देत आहेत. या धमक्यांमुळे बांगलादेशातील हिंदू लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक हिंदूंना त्यांच्या सुरक्षेची भीती वाटते आणि त्यांना दुर्गापूजा शांततेत साजरी करता येणार नाही याची काळजी वाटते.