ऑस्ट्रेलियात दोन हिंदू मंदिरांची तोडफोड, हल्लेखोरांनी भरलेल्या दानपेट्या पळवल्या!

    28-Oct-2024
Total Views |

Hindu temple attacked in Australia

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Hindu temple attacked in Australia)
ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा शहरात असलेल्या दोन हिंदू मंदिरांवर हल्ला झाल्याची घटना निदर्शनास आली आहे. शनिवारी दुपारी मुखवटा घातलेल्या काही हल्लेखोरांनी मंदिरे फोडून चोरी केल्याची माहिती आहे. द ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, एकूण ४ जणांनी मिळून मंदिरातील ४ दानपेट्या चोरल्या ज्यात साधारण हजारो डॉलर्स असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हे वाचलंत का? : 'IIT Bombay'मध्ये महमूद फारुकींना दणका!

Hindu temple attacked in Australia

सुमारे १५ मिनिटे चाललेला हा हल्ला शहरातील अल्बर्ट हॉलमध्ये आयोजित वार्षिक दिवाळी मेळ्याच्या निमित्ताने झाला असल्याचे म्हटलं जात आहे. हिंदू मंदिराचे उपाध्यक्ष तरुण अगस्ती म्हणाले की, “आमच्या मंदिरात आठवड्याच्या शेवटी झालेल्या तोडफोड आणि चोरीच्या अलीकडील कृत्यामुळे आम्ही अत्यंत दु:खी आणि व्यथित आहोत. आमच्या प्रार्थनास्थळाचा आणि समाजाचा अनादर करण्याच्या हेतूने झालेले हे कृत्य निराशाजनक आहे." तरुण अगस्ती यांनी मंदिराची तोडफोड आणि लूट करणाऱ्या अतिरेक्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

Hindu temple attacked in Australia

द ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, त्यानंतर अतिरेकी दुपारी २ वाजता कॅनबेरा येथील श्री विष्णू शिव मंदिराकडे मार्गस्थ झाले. त्यांनी मंदिराच्या स्वागत क्षेत्राची तोडफोड केली. तेखील दोन दानपेट्या घेऊन अतिरेकी पळून गेले. त्यांनी हिंदू धर्मस्थळाच्या गर्भगृहाचा भंग केला, देवतांचे कपडे असलेल्या कपाटांचे नुकसान केले. त्याच अतिरेक्यांनी एक शिवलिंग देखील नष्ट केले. द ऑस्ट्रेलिया टुडेशी बोलताना मंदिराचे अध्यक्ष थामो श्रीधरन म्हणाले, "मी नवनिर्वाचित सरकारला विनंती करू इच्छितो की आमच्या मंदिरे आणि समुदायाचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन प्रदान करावे." कॅनबेरा पोलिस सध्या दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.