मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक केके (KK) अर्थात कृष्णकुमार कुन्नथ यांना आज गुगल डुडलनं विशेष मानवंदना दिली आहे. पण आज २५ ऑक्टोबर रोजी केके यांची ना पुण्यतिथी आणि ना जयंती मग का त्यांच्या नावाचं डुडल केलं आहे असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे.
केके यांचं डुडल करायचं कारण म्हणजे त्यांच्या करिअरमधला आजचा खास दिवस आहे. १९९६ मध्ये माचिस चित्रपटातून केके यांनी बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून पदार्पण केलं होतं. ‘छोड़ आए हम’ या गाण्यानं त्यांच्या कामाची सुरुवात झाली होती. २५ ऑक्टोबर या तारखेचं या चित्रपटाशी विशेष नातं असल्यामुळे त्यामुळं गुगलं त्यांच्या करिअरवर प्रकाश टाकला आहे.
माचिसनंतर १९९९मध्ये केके यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात ‘तड़प तड़प के इस दिल से’ हा गाणं गायलं आणि त्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर त्यांनी अनेक अजारमर गाणी दिली आहेत.