मविआचं जागावाटप संख्येनुसार नाही, तर मेरिटनुसार : विजय वडेट्टीवार
24-Oct-2024
Total Views |
मुंबई : महाविकास आघाडीचं जागावाटप संख्येनुसार नाही तर मेरिटनुसार झालं, असं वक्तव्य काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारी यांनी केले आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. जागावाटपासंदर्भात मविआच्या बैठका सुरु असून त्यांच्यातील तिढा अद्याप सुटलेला नाही.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "२७० जागांवर आमचं एकमत झालं आहे. तिन्ही पक्षांना ८५ जागांच्या फॉर्म्युलानुसार, २५५ जागा क्लिअर झाल्या. काही जागा मित्रपक्षांसाठी आम्ही सोडल्या आणि काही जागांवर आपापसात बदल करण्याचा निर्णय घेत आहोत. जागावाटप करत असताना आम्ही आकडे न पाहता मेरिटवर गेलो. कोणी किती जागा लढवाव्या, यासाठी आमचा आग्रह नव्हता, तर केवळ मेरिटवर कशी निवड करता येईल याचा आम्ही विचार केला," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "आम्ही विदर्भात ४२ ते ४३ जागा लढणार आहोत. विदर्भात काँग्रेसला जनता मजबूतीने साथ देईल आणि महाविकास आघाडीचं सत्ता आणण्यात विदर्भाचा मोठा वाटा राहिल. आज किंवा उद्या संध्याकाळी काँग्रेसची पहिली यादी येईल," असेही त्यांनी सांगितले.