प्रभासने वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राइज, 'राजा साब'चं दमदार पोस्टर प्रदर्शित

    23-Oct-2024
Total Views |

prabhas  
 
 
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याचा आज २३ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. आणि त्याचे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना विशेष सरप्राईज दिलं आहे. प्रभास लवकरच 'द राजा साब' या चित्रपटातून हटके भूमिकेत भेटीला येणार असून आज त्याने दमदार पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
 
अभिनेता प्रभासने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर करत लिहिले की, साहसाची वेळ आली आहे. १० एप्रिल, २०२५ला सिनेमागृहात भेटूयात. या पोस्टरमध्ये प्रभासचा दमदार अंदाज पाहायला मिळतो आहे. सिंहासनावर बसलेला प्रभास नक्कीच पावरफुल भूमिका साकारणार असे दिसत आहे.
 

prabhas  
 
 
दरम्यान, दिग्दर्शक मारुती दिग्दर्शित प्रभासच्या या चित्रपटात निधी अग्रवाल आणि मालविका मोहनन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'द राजा साब' हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. पीपल मीडिया फॅक्टरीच्या बॅनरखाली 'द राजा साब'ची निर्मिती होत आहे. तसेच, या चित्रपटात अभिनेता संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.