वरळीत पुतण्याविरोधात काकांचा पक्ष! आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे थेट लढत

    23-Oct-2024
Total Views | 155
 
Aditya Thackeray
 
मुंबई : मनसेने मंगळवारी रात्री विधानसभा निवडणूकीसाठी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात वरळी विधानसभा मतदारसंघात संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा वरळीत पुतण्याच्या विरोधात काकांनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केल्याची चर्चा रंगली आहे.
 
हे वाचलंत का? -  अमित ठाकरेंभोवती एकनाथ शिंदेंचा चक्रव्यूह!
 
महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. परंतू, २०१९ ला वरळी विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे निवडून आले होते. त्यामुळे यंदासुद्धा त्यांना इथून तिकीट देण्याची शक्यात आहे. असे झाल्यास यावेळी आदित्य ठाकरेंचा मनसेच्या संदीप देशपांडे यांच्याशी त्यांचा सामना रंगणार आहे. महायूतीने वरळीचा उमेदवार जाहीर केल्यास याठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121