लखनऊ : बहराइच येथील झालेल्या हिंसाचारात आरोपींच्या घरावर बुलडोझरच्या कारवाई होत आहेत. हे प्रकरण आता मानवाधिकार आयोगाकडे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील डॉ. गजेंद्र सिंह यादव यांनी आयोगात याचिका दाखल करून आरोपींच्या घरावर बुलडोजर चालवण्यास बंदीची मागणी केली आहे. असे कृत्य केल्यास मानवी हक्कांचे उल्लंघन असेल असे ते म्हणाले आहेत.
शुक्रवारी २३ घरांवर अतिक्रमणाबाबत नोटीसा लावण्यात आल्या असल्याने एकच खळबळ उडाली होती. अनेक कुटुंबांनी घरे तोडण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील हिंसाचाराचा मुख्य आरोपी अब्दुल हमीद व्यतिरिक्त महसी भागात इतर लोकांचा समावेश आहे. या नोटिशीला उत्तर न दिल्यास दोन दिवसांमध्ये बांधकामे पाडण्यात येतील, असे नमूद करण्यात आले.
याआधी बेकायदा घरांवर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आता आरोपींच्या घरांना लक्ष केले गेले जात असल्याचा आरोप संबंधित वकिलांनी केला आहे. आता हे अतिक्रमण हटवण्यासाठी शहरातील प्रत्येक अवैध घरे पाडण्यात यावी. अशी योग्य ती प्रक्रिया न करता कोणतेही घर तोडण्यास कारवाई करु नये अशी मागणी वकिलांनी केली.