रिलायन्स समूहाने केला नवा करार; समभागधारकांना दुप्पट परतावा!

    02-Oct-2024
Total Views | 69
reliance-group-will-start-a-new-company-in-bhutan


मुंबई :       रिलायन्स समूह भूतानमध्ये नवीन कंपनी सुरू करणार असून कंपनीने सरकारशी करार केला आहे. भूतानमधील ड्रुक होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड(डीएचआय) या कंपनीसोबत रिलायन्स पॉवरने करार केला आहे. रिलायन्स समूहाने भूतानमध्ये एक नवीन कंपनी सुरू करणार आहे. या करारामुळे कंपनीच्या समभागांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
 
 


दरम्यान, दि. ०२ ऑक्टोबर रोजी रिलायन्स पॉवरने डीएचआयसोबत करार केला असून ही गुंतवणूक भूतानच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार आहे. तसेच, रिलायन्स पॉवर देशातील सर्वात मोठी एफडीआय कंपनी आहे. रिलायन्स समूहाने भूतानच्या अक्षय आणि हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 
भूतानच्या रॉयल सरकारची व्यावसायिक आणि गुंतवणूक कंपनी असलेल्या ड्रुक होल्डिंग आणि रिलायन्स ग्रुप यांच्यातील भागीदारी हरित ऊर्जा उत्पादनावर (विशेषत: सौर आणि जलविद्युत) लक्ष केंद्रित करेल. याशिवाय नाविन्यपूर्ण हरित तंत्रज्ञानावरही काम करणार आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.


रिलायन्स पॉवर-डीएचआय डीलमध्ये काय?

रिलायन्स एंटरप्रायझेसने भूतानमधील गेलेफु माइंडफुलनेस सिटीमध्ये ५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प संयुक्तपणे विकसित करण्यासाठी ड्रुक होल्डिंगसोबत भागीदारी केली आहे. हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत प्रत्येकी २५० मेगावॅटच्या दोन टप्प्यांत कार्यान्वित होणार असून हा सर्वात मोठा प्लांट असेल. प्रकल्प भूतानच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. शिवाय, भारतीय कंपनीची ही सर्वात मोठी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक(एफडीआय) आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

ना दरवाजे, ना अटेंडंट, ना सुरक्षा विद्यार्थी लोंखडीपट्टयांना धरून करतात प्रवास अंबरनाथ मधील अपघाताच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असतानाच कल्याणात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. विशेष म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक ही अटेंडंट (सहाय्यक) सोबत नाही. विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू असताना आरटीओच्या अधिकाऱ्याचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतरच जाग येणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121