भारतीय विमान कंपन्यांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची कारवाईची मागणी

    19-Oct-2024
Total Views |

 Indian airlines
 
नवी दिल्ली : भारतीय विमान कंपन्यांना बॉम्ब उडवण्याच्या अनेक धमक्या येताना दिसत आहेत. या घटनेत सध्या सर्वाधिक वाढ होत आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याप्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे.
 
राम मोहन नायडू म्हणाले, अशा प्रकरणांवर कारवाई केली जात आहे. या कटाबद्दल आम्ही आत्ताच काही सांगू शकत नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, हे या धमक्या केवळ थिल्लरबाजी आहे का? असा सवाल आहे. या सर्व किरकोळ घटना आहेत... आम्ही एअरलाइन्स, सुरक्षा एजन्सी आणि मंत्रालयाकडे याप्रकरणाबाबत पाठपुरावा कारण्यास सांगू अशी माहिती आहे.
 
याआधी शनिवारी १९ ऑक्टोबर २०२४ दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्प्रेसच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली होती. ही धमकी मेलद्वारे देण्यात आली होती. यानंतर विमान जयपूर येथे उतरवण्यात आले तेव्हा त्या प्रकरणात काहीही एक आढळून आले नाही.
 
याआधीही एअर इंडिया कंपनीचे विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या बॉम्बच्या सहाय्याने उडवण्यात येईल अशी धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. बॉम्बच्या धमकीनंतर विमानाचे नवी दिल्ली येथे अपत्कालीन परिस्थितीत लँडिंग करावे लागले. दुसरीकडे मुंबईहून हावडा येथून जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेतही बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती.