"... तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट होईल"

मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज व्हायरल

    18-Oct-2024
Total Views |

Salman Khan
 
मुंबई : अभिनेता सलमान खानला (Salman Khan) मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रामांकावर जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ५ कोटीं रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, जर सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईसोबत वैर संपवून जिवंत राहायचे असेल तर किमान ५ कोटी रुपये द्यावे. जर पैसे दिले नाहीतर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट होईल. या मेसेजमुळे मुंबई पोलीस याप्रकरणाचा तपास सुरू करत आहेत.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धमकी लॉरेन्स बिश्नोई टोळीने पाठवल्याची माहिती आहे. मात्र पोलिसांना त्रास देण्यासाठी ही बिश्नोई गँगने धमकी दिली असल्याची माहिती आहे. आता याप्रकरणात पोलिसांनी पुष्टी केली नसल्याची माहिती आहे. सलमान खानला याआधी अनेकदा धमकी देण्यात आली होती. जून महिन्यात सलमान खान हा त्याच्या पनवेल येथील फार्महाऊस येथे होता. त्यावेळी त्याच्या फार्महाऊसमध्ये काही लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता.
 
 
 
दरम्यान काही दिवसांआधी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकींवर वांद्रे येथे गोळीबार करण्यात आला होता. बाबा सिद्दिकी हे अभिनेता सलमान खानचे निकटवर्तीय होते. त्याआधी सलमान खानवरही गोळीबार करण्यात आला होता. मात्र सलमान खान थोडक्यात बचावला गेला होता. सरकारने सलमान खानला वाय प्लस सुरक्षा दिली आहे.