मनसे कार्यकर्त्याचा झुंडबळी! राज ठाकरेंनी घेतली मृत आकाशच्या कुटूंबियांची भेट

    17-Oct-2024
Total Views | 99

raj thackeray
 
( फोटो सौजन्य - E-Sakal ) 
 
मुंबई : ( Raj Thackeray )काही दिवसांपूर्वी मालाड पूर्व येथे घडलेल्या मनसे कार्यकर्त्याच्या मुलाच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. कट मारल्याने सुरू झालेल्या किरकोळ वादातून रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी मिळून आकाश माइन याला केलेल्या बेदम मारहाणीमुळे त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील पीडित कुटुंबियांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मालाड येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली.
 
आकाश हा मनसे कार्यकर्त्या दिपाली व दत्तात्रय माइन यांचा मुलगा. काही दिवसांपूर्वी कारच्या शोरुम मधून घरी परतत असताना हा दुर्देवी प्रकार आकाश व त्याच्या कुटुंबियांसोबत घडला. याच हत्याप्रकरणातील कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे मालाड येथे पोहोचले आहेत. राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी दिपाली माइन यांचे सांत्वन करत माइन कुटुंबियांना धीर दिला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

कायद्याच्या राजवटीने शासित असलेल्या देशात जातीवर आधारित कोणताही भेदभाव मान्य नाही, असे गुरूवार दि.१७ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अय्यनार मंदिरात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या (एससी) भाविकांना अडविल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने अरियालूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना आणि उदयारपलयम महसूल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, “पुथुकुडी येथील अय्यनार मंदिर प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या भाविकांना आडवू नये आणि त्यांना उत्सवात सहभागाची संपूर्ण मुभा दिली जावी.”..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121