ठाण्यात राज्यस्तरीय शिक्षक स्नेह मेळावा

हजारो शिक्षक उपस्थित राहणार; डॉ. विशाल कडणे यांची संकल्पना

    17-Oct-2024
Total Views | 301
 
Teacher Meeting program
 
मुंबई ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शनिवार दि.१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०३:०० वाजता डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे राज्यस्तरीय शिक्षक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील शिक्षक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विशाल कडणे आहेत.
 
या मेळाव्यामध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, टीचर ऑफ द ईअर, प्रिन्सिपल ऑफ द ईअर, आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या मेळाव्यास अंदाजे ११०० हून अधिक शिक्षक उपस्थित राहतील. या कार्यक्रमाची सुरुवात स्मार्टफोनचे दुष्परिणाम आणि घरातील सुसंवाद या चर्चासत्राने होईल. त्यानंतर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि निबंध वाचनाचा कार्यक्रम आहे. वर्ष २०२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या १११ शिक्षकांचा सन्मान देखील मेळाव्यात केला जाणार आहे. जीवन गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक, सर्वोत्कृष्ट विषय शिक्षक इत्यादी विविध पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात येणार आहे.
 
स्मार्टफोन दुरुपयोगापासून तरुणाईला परावृत्त करणे आणि सर्वांना मराठी भाषेचा, अक्षरांचा लळा लावणे इत्यादी लोकोपयोगी वृत्तींचा प्रचार करणार्‍या आजीबाई जोरात नाटकाची टीम शिक्षकांसोबत संवाद साधेल. कार्यक्रमात आजीबाई जोरातचे टीम सदस्य अभिनेत्री निर्मिती सावंत, सिंघम सिनेमा लेखक क्षितिज पटवर्धन, अभिनेता जयवंत वाडकर, पुष्कर श्रोत्री विशेष निमंत्रित आहेत. गृहनिर्माण चळवळीतील युवा नेतृत्व मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशन संचालक डॉ. विशाल कडणे कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
 
या कार्यक्रमात सोमैया विद्यापीठाचे अधिष्ठाता, डॉ. गजानन रत्नपारखी, ठाण्याचे कमलेश प्रधान, सरस्वती समूहाच्या वर्षा सावंत, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विविध दिग्गज आणि शिक्षण क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विविध साहित्यिक, लेखक, दै. मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, सिंघम अगेन दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन, सिनेनिर्माते दिलीप जाधव या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभले आहेत.
 
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा परांजपे करतील. दै.मुंबई तरुण भारत हे मीडिया पार्टनर आहेत. या मेळाव्याला मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अले आवाहन कार्यक्रमाचे संयोजक डॉ. विशाल कडणे यांनी केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121