मोठी बातमी! अधिकारी समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात?

    17-Oct-2024
Total Views | 388

Sameer Wankhede 
 
मुंबई : सर्वत्र विधानसभेच्या निवडणूकीची धामधूम सुरु असतानाच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आरआरएस अधिकारी समीर वानखेडे हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे लवकरच राजीनामा देऊन राजकारणात एन्ट्री घेणार आहेत. ते शिवसेनेतून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. समीर वानखेडे शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांना धारावी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
हे वाचलंत का? -  वंचितची तिसरी यादी जाहीर! ३० उमेदवारांना संधी
 
धारावी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार होत्या. परंतू, त्यांनी लोकसभा निवडणूकीत विजय मिळवल्याने त्यांची जागा रिक्त आहे. दरम्यान, या जागेवर काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याबाबत अद्याप जाहीर करण्यात आले नाही. मात्र, धारावीमध्ये समीर वानखेडे हे महायूतीचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नसून राजकीय वर्तुळात त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे. समीर वानखेडे हे अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आले होते.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कुर्ल्यातील रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा खोटा आरोप?

कुर्ल्यातील रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा खोटा आरोप?

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सवाल कुर्ल्यातील महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरातील जंगल तोडून स्विमिंग पूल बांधत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तिथे स्विमिंग पूल नव्हे, तर शिवकालीन पारंपरिक खेळांचं मैदान उभं राहत आहे. आदित्य ठाकरेंचा खरा उद्देश त्या परिसरातील रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा आहे का?” असा सवाल मंत्री लोढा यांनी उपस्थित केला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121