'हिंदुस्तान मुर्दाबाद...' म्हणणाऱ्या फैजानला दर मंगळवारी वंदे मातरम् म्हणत तिरंग्याला २१ सलामी देण्याचे आदेश
17-Oct-2024
Total Views |
भोपाळ : मध्य प्रदेशात उच्च न्यायालयाने पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देणाऱ्या एका व्यक्तीला काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. त्याने एका महिन्यातून दोन वेळा पोलीस ठाण्यात यावे आणि दर मंगळवारी २१ वेळा राष्ट्रध्वजाला वंदन करावे, जर त्याने असे केले तरच त्याला जामीन दिला जाईल, असे न्यायालयाने सांगितले.
न्यायालयाने सांगितले की, आरोपीने दर महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान न्यायालयाने दिलेल्या अटींचे पालन करावे लागेल. याशिवाय आरोपींवर ५० हजार रुपयांचा जातमुचलक भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मध्य प्रदेशातील उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती दिनेश कुमार पालीवाल यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला. फैजान नावाच्या आरोपीच्या खटल्याची सुनावणी करताना त्याने आपला निर्णय दिला. ते म्हणाले की तो ज्या देशात जन्मला आला त्या देशाप्रती आदर असावा.
फैजानला कलम १५३ अंतर्गत पोलिसांनी ताब्यात घेतले असून नंतर आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगत त्याने कोर्टाकडे जामीन मागितला. तथापि, फिर्यादीने व्हिडिओ दाखवल्याने आरोपीचे कृत्य पकडण्यात आले.