मुंबई : काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलू नये, असा पलटवार भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केला आहे. संजय राऊतांनी भाजपवर टीका केली होती. यावर नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिले.
नितेश राणे म्हणाले की, "काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलू नये. तुम्हाला दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसपुढे मुजरे करावे लागतात. तरीसुद्धा काँग्रेसचे लोक तुमच्याकडे ढुंकून बघत नाही. एकेका जागेसाठी उबाठा गटाला नाक रगडावं लागत आहे. एवढं असूनही ते महायूतीवर टीका करण्याची हिंमत करतात."
"उद्धव ठाकरे आणि त्याग हे समीकरणच नाही. त्यामुळे त्याग या शब्दाचं महत्व संजय राऊतांना कधीही कळणार नाही. दुसऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा करणं, हिंदुत्व या विषयावर तडजोड करणं यापलीकडे संजय राऊत आणि त्यांच्या मालकाने काहीच केलेलं नाही. त्यामुळे हिंदूत्वाचं सरकार आणण्यासाठी भाजपने केलेला त्याग त्यांना कधीही कळणार नाही," अशी टीकाही त्यांनी केली.