मराठवाड्यात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे!

    12-Oct-2024
Total Views |
 
Munde & Jarange
 
बीड : मराठवाड्यात दरवर्षी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असतो. परंतू, यावर्षी पहिल्यांदाच इथे दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. पंकजा मुंडेंसोबतच मनोज जरांगेंदेखील दसरा मेळावा घेणार आहेत. दरम्यान, या दसरा मेळव्यात कोण काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
हे वाचलंत का? -  'त्या'दिवशी मविआतील ३ पक्षांचे ६ पक्ष होतील! रावसाहेब दानवेंची टीका
 
पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा होणार आहे तर, मनोज जरांगेंचा नारायण गडावर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे हे दोघेही आपापल्या मेळाव्याचा ठिकाणी दाखल झाले आहेत. पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात यावर्षी पहिल्यांदाच त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडेदेखील उपस्थित राहणार आहेत.