जिल्हा स्वीप नोडल अधिकारी यांच्यामार्फत बेघर व्यक्तींना निवडणूक ओळखपत्रांचे वाटप
11-Oct-2024
Total Views |
कल्याण, दि. ११ : ( Kalyan Dombivli Municipal Corporation )कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बेघर व्यक्तींसाठी कल्याण पश्चिमेतील क प्रभागात, आणि डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी तसेच टिटवाळा परिसरात बेघर निवारा केंद्राची व्यवस्था केली आहे.
जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील सावली निवारा केंद्र येथे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजय जाधव यांनी निवडणूक ओळखपत्रांचे गुरुवारी वाटप केले. या व्यक्तींना आगामी विधानसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन केले.