राऊतांविरोधात मध्य प्रदेशात गुन्हा दाखल

पराभवाच्या भितीनेच उबाठाकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न : मोहन यादव

    11-Oct-2024
Total Views | 49
 
sanjay raut
 
नवी दिल्ली, दि. १० : ( Sanjay Raut ) मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना योजने’विषयी दिशाभूल करणारी टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसेना उबाठाचे खा. संजय राऊत यांच्याविरोधात मध्यप्रदेश पोलिसांनी बुधवारी एफआयआर नोंदवला. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौहान यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भोपाळ गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अखिल पटेल यांनी दिली आहे.
 
संजय राऊत यांनी जाणीवपूर्वक अशी दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, राऊत यांच्या विधानाचा उद्देश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची प्रतिमा डागाळणे आणि महिला लाभार्थ्यांच्या भावना दुखावण्याचा आहे. शिवसेना उबाठा खासदाराने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या आणि चुकीच्या माहितीद्वारे असंतोष निर्माण करण्याच्या कटाचा भाग म्हणून हे दिशाभूल करणारे विधान केले असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
 
भाजपनेत्या पुढे म्हणाल्या की, “राज्यातील भाजप सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा १ हजार, २५० रुपये दिले जात आहेत. भाजप सरकार भगिनींच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे. त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी भाजप सरकार महिलांच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे. संजय राऊत यांनी असे वक्तव्य करणे अत्यंत लज्जास्पद आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.
 
भोपाळ गुन्हे शाखेचे अतिरिक्त उपायुक्त शैलेंद्र सिंह चौहान म्हणाले की, “काही नेते सरकारच्या धोरणांबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. यासंदर्भातील तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे. आम्ही या तक्रारीवरून संजय राऊत विरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५३(२)’ आणि ‘३५६ (२)’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
मध्य प्रदेशात येऊन बघावे
 
मध्य प्रदेशात ‘लाडली बहना योजना’ यशस्वीपणे सुरू असून दरमहा १.२९ कोटी भगिनींना त्याच्या हक्काची रक्कम प्राप्त होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी मध्य प्रदेशात येऊन ते बघावे. महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजने’मुळे भाजपला सत्ता प्राप्त होईल. त्यामुळे पराभवाच्या भीतीने घाबरलेल्या उबाठा नेत्यांकडून अशी विधाने येत आहेत, अशी खरमरीत प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली अहमदाबाद विमान दुर्घटना : पार्थिवावर राजकोट येथे अंत्यसंस्कार; ३२ जणांचे डीएनए जुळले

विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली अहमदाबाद विमान दुर्घटना : पार्थिवावर राजकोट येथे अंत्यसंस्कार; ३२ जणांचे डीएनए जुळले

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाचा दि. १२ जून रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला होता. तीन दिवसांनंतर डीएनए चाचणीमुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. विजय रुपाणींचा डीएनए जुळला असल्याची माहिती रुग्णालयाने रविवार दि. १६ जून रोजी सकाळी ११.१० वाजता दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबाकडे दिले. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर राजकोट ..

धर्मांधांनी मंदिराबाहेर फेकले गोमांसाचे तुकडे; मुख्यमंत्र्यांनी दिले

धर्मांधांनी मंदिराबाहेर फेकले गोमांसाचे तुकडे; मुख्यमंत्र्यांनी दिले 'Shoot at Sight'चे आदेश

आसाममध्ये गेल्या अनेक दिवसांपासून इस्लामिक कट्टरपंथी हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. मंदिर परिसरात वारंवार गोमांस फेकून हिंदूंच्या श्रद्धेची खेळण्याचा प्रयत्न होतो आहे. आसामच्या लखीपूर येथील काली मंदिराजवळ गोमांस फेकण्याची घटना घडल्याने परिसरात जातीय तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी आसाममधील धुबरीमध्येही असाच काहीसा प्रकार घडला होता. त्यामुळे स्थानिक हिंदूंमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी सुद्धा आरोपींना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिलेत...

अमेरिकेवर हल्ला केल्यास वाईट परिणाम होतील डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; इस्रायलकडून तीव्र प्रत्युत्तर

अमेरिकेवर हल्ला केल्यास वाईट परिणाम होतील डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; इस्रायलकडून तीव्र प्रत्युत्तर

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. इस्रायलने केवळ इराणच्या अणू ठिकाणांवर हल्ले केले नाहीत, तर नऊ शास्त्रज्ञांनाही ठार केले आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, "इराणवर झालेल्या ताज्या इस्रायली हल्ल्यांमध्ये अमेरिकेची काहीही भूमिका नव्हती. पण, इराणने अमेरिकेवर हल्ला केला, तर आमचे लष्कर संपूर्ण ताकदीने त्याच्यावर तुटून पडेल. ही कारवाई अशी असेल, जिचा विचार इराणने कधीच केला नसेल.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पोस्ट शेअर केली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121