मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तातडीची पत्रकार परिषद ठेवली आहे. या बैठकीत अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सोमवारी सायंकाळी अजित पवारांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे.