मराठी भाषा दिनानिमित्त खुली लेख स्पर्धा!

"माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्यातील स्थान" या विषयावर खुली लेख स्पर्धा!

    05-Jan-2024
Total Views | 318
Marathi Language Day Competition

मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिन आणि मराठी भाषा दिवसानिमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच यावेळी ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.

यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ मुबंईसह संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्र लेखक, निवृत्त व सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी विनामूल्य 'माझ्या मायबोलीचे मराठी साहित्यातील स्थान' या विषयावर १२०० शब्दमर्यादा असलेली खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची घोषणा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केली आहे. कोसकोसावर बदलणाऱ्या महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषांनी आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे. खेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते, कशीही असो ती 'मराठी' च म्हणून मराठी माणसाला आवडते.

बोलीभाषेतील साहित्यकृतींचा धांडोळा घेत स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी लेख लिहावा यावा अशी अपेक्षा आहे, पहिल्या ५ जणांना रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व इतरांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. युनिकोड फॉंट मध्ये टाईप करून दि १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लेख chalval1949@gmail.com वर पाठवावेत. .तसेच स्पर्धेची अधिक माहिती, नियमावली व आगावू नोंदणी करण्यासाठी स्पर्धा समन्वयक राजन देसाई ८७७९९८३३९० यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त ऍड देवदत्त लाड, विकास होशिंग, संजीव गुप्ते यांनी केले आहे.





अग्रलेख
जरुर वाचा
महारेराकडील नोंदणीकृत एजंटसची संख्या ५० हजारांवर

महारेराकडील नोंदणीकृत एजंटसची संख्या ५० हजारांवर

महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटसच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात केवळ राज्यातील एजंटस आहेत असे नाही तर महाराष्ट्राचे त्यातही विशेषतः मुंबई महाप्रदेश आणि पुणे परिसराचे स्थावर संपदा क्षेत्रातील वेगळे स्थान लक्षात घेता देशाच्या बहुतेक राज्याच्या प्रमुख शहरातील एजंटसनी महारेराकडे नोंदणी केलेली आहे. यात नवी दिल्ली, गुरगाव, प्रयागराज, हैद्राबाद, बंगळुरू, कांचीपुरम, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121