ही आहेत अयोध्येत निर्माणाधीन श्री रामजन्मभूमी मंदिराची वैशिष्ट्ये! वाचा सविस्तर...

    04-Jan-2024
Total Views |
ram mandir
 
लखनौ : अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी भव्य सोहळ्याची जोरगदार तयारी सुरू आहे. भव्य राममंदीरीच्या उभारणीचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टने राम मंदीराच्या वैशिष्ठांची माहीती दिली आहे. ट्रस्टच्या अधिकृत 'एक्स' अकांउंट वर पोस्ट करत ही माहीती देण्यात आली आहे.

काय आहेत अयोध्येत निर्माणाधीन श्री रामजन्मभूमी मंदिराची वैशिष्ट्ये
  •  मंदिर पारंपारिक नगर शैलीत बांधले जात आहे. 
  •  मंदिराची लांबी (पूर्वेकडून पश्चिमेकडे) ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट असेल. 
  •  मंदिर तीन मजली असेल. प्रत्येक मजल्याची उंची २० फूट असेल. मंदिरात एकूण ३९२ खांब आणि 44 दरवाजे असतील. 
  •  मुख्य गाभाऱ्यात प्रभू श्री रामचंद्रांचे बालस्वरूप आणि पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार असेल. 
  •  मंदिरात ५ मंडप असतील नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप. 
  •  खांब आणि भिंतींवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरल्या जात आहेत. 
  •  मंदिरात पूर्वेकडून प्रवेश असेल, सिंहद्वार येथून ३२ पायऱ्या चढून प्रवेश केला जाईल. 
  •  मंदिरात अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प त्याचबरोबर लिफ्टची व्यवस्था असेल. 
  •  मंदिराभोवती एक आयताकृती भिंत असेल. त्याची चारही दिशांना एकूण लांबी ७३२ मीटर आणि रुंदी १४ फूट असेल. 
  •  परीसराच्या चार कोपऱ्यांवर सूर्यदेव, आई भगवती, गणपती आणि भगवान शिव यांना समर्पित चार मंदिरे बांधली जातील. उत्तरेला अन्नपूर्णेचे मंदिर आणि दक्षिणेकडे हनुमानाचे मंदिर असेल. 
  •  मंदिराजवळ पौराणिक काळातील सीताकूप असेल. 
  •  मंदिर संकुलातील प्रस्तावित इतर मंदिरे महर्षी वाल्मिकी, महर्षि वशिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषिपत्नी देवी अहिल्या यांना समर्पित असतील. 
  •  दक्षिण-पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळ्यावर भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे जटायूची मूर्ती बसवण्यात आली आहे. 
  • मंदिरात लोखंडाचा वापर केला जाणार नाही. जमिनीवर काँक्रीट अजिबात नाही. 
  • मंदिराच्या खाली १४ मीटर जाडीचा रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट (RCC) टाकण्यात आला आहे. त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले आहे.
  •  मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाईटचा २१ फूट उंच मंडप तयार करण्यात आला आहे.
  •  मंदिर संकुलात सीवर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आले आहे, जेणेकरून बाह्य संसाधनांवर कमीत कमी अवलंबित्व राहील. 
  • २५,००० क्षमतेचे यात्रेकरू सुविधा केंद्र बांधले जात आहे, जेथे यात्रेकरूंचे सामान आणि वैद्यकीय सुविधा ठेवण्यासाठी लॉकर असतील. 
  •  मंदिर परिसरात स्नानगृह, स्वच्छतागृह, वॉश बेसिन, उघडे नळ आदी सुविधाही असतील. 
  •  मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे. पर्यावरण-जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले जात आहे. एकूण ७० एकर क्षेत्रापैकी ७०% क्षेत्र कायम हिरवेगार राहील.