जितेंद्र आव्हाड हे दुष्ट प्रवृत्तीचे नेते- अयोध्येच्या महाराजांची टीका

    04-Jan-2024
Total Views |
Acharya Purushottam Das on Jitendra Awhad

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट)चे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले होते. या शिबिरात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उद्धाटनावर बोलताना एक वादग्रस्त विधान केले. त्यानंतर देशभरातून साधू-मंहतांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच अयोध्येचे महाराज श्री. आचार्य पुरुषोत्तम दास यांनी आव्हाडांवर टीका केली आहे.

श्री. आचार्य पुरुषोत्तम दास म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे दुष्ट प्रवृत्तीचे नेते , भगवान श्रीरामाबद्दल त्यांनी केलेल्या विधानासाठी रामभक्त त्यांना माफ करणार नाही.जितेंद्र आव्हाड श्रीरामाचे दर्शन करा तुमची बुद्धी शुद्ध होईल, असा टोला ही महाराजांनी लगावला.

प्रभू श्रीरामचंद्राबाबत आव्हाड काय म्हणाले?

आव्हाड म्हणाले की, राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. शिकार करून खाणार राम आमचा आहे. आज सगळे आम्हाला शाकाहारी बनवायला जातात पण आम्ही रामाचा आदर्श पाळतोय. त्यामुळे राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. रामाने १४ वर्ष वनवास भोगला, मग शाकाहारी कसा असेल? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर आता सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.