'अफजलखानाचा वध' हा देखावा सादर करण्याला कट्टरपंथींचा विरोध; म्हणाले, आमच्या भावना.....
31-Jan-2024
Total Views | 533
अकोला : जिल्यांतील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला येथे झालेल्या वार्षिक संमेलानामध्ये काही विद्यार्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानचा वध करताना दाखविणारा देखावा सादर केला होता. हा देखावा सादर केल्यामुळे काही कट्टरपंथी तरुणांनी देखावा सादर करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
संस्थेच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी अफजलखानाचा वध हा पोवाडा सादर केला होता. हे सादरीकरण पाहुन आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत असा दावा महाविद्यालयातील मुस्लिम विद्यार्थांनी केला असुन त्यांनी माफी मागावी अशीही मागणी केली. या कट्टरपंथी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक हिंदू संघटनांनी कॉलेजकडे केली आहे.
पोवाडा सुरु असताना हे विद्यार्थी त्या कार्यक्रमातुन उठुन गेले. त्यानंतर काही वेळाने परत येवुन त्यांनी आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं सांगत. पोवाडा सादर करणाऱ्या विद्यार्थांना व्यासपिठावर येवुन माफी मागण्यास सांगितले. ही घटना समजताच काही हिंदुत्ववादी संघटनांचे नेते महाविद्यालात पोहोचले व त्यांनी या कट्टरपंथी विद्यार्थांवर कारवाई करण्याची मागणी केली.