नवी दिल्ली : मुस्लिम समान नागरी संहिता (यूसीसी) पेक्षा कुराणला प्राधान्य देतील. नागरिक सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधातही निषेध व्यक्त केला असून सीएए लागू करणे हे एनआरसी आणण्याचे पहिले पाऊल आहे आणि ते मान्य नाही आणि त्याचा निषेध केला जाईल, असे वकतव्य समाजवादी पार्टीचे नेते एस टी हसन यांनी केले आहे.
दरम्यान, समान नागरी संहितेवर बोलताना, एसटी हसन म्हणाले की, जरी देशात युसीसी लागू झाला तरी मुस्लिम कुराणाचे पालन करतील, तसेच जर कायद्यात शरियतच्या विरोधात काही असेल तर आम्ही ते स्वीकारणार नाही. आम्ही कुराण आणि हदीसचे अनुयायी आहोत. आमच्या धर्मावर हल्ला झाला तर आम्ही कोणत्याही थराला जाऊ.” असेही एस टी हसन म्हणाले.
सपा नेते एस टी हसन यांनी याआधी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांनी जून २०२३ मध्ये, त्यांनी 'युसीसी'ला विरोध केला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितले की, मुस्लिम फक्त कुराणचे पालन करतील. ते पुढे म्हणाले, “भारत हा विविधतेचा देश आहे. जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा डॉ. आंबेडकरांनी लिहिले की, प्रत्येक व्यक्ती आपल्या धर्माचे पालन करण्यास आणि प्रचार करण्यास स्वतंत्र आहे. हे आपल्या संविधानात लिहिलेले आहे. जर आपल्याला शरियतनुसार आपले जीवन जगायचे असेल तर कोणाला त्रास का आहे.”