मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना केपटाऊनच्या न्यूलँडस येथे खेळविण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात आफ्रिकेने फक्त ५५ धावा केल्या. भारतीय गोलंदाजीने आफ्रिकन फलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडवली. मोहम्मद सिराजने निम्मा आफ्रिकन संघ पव्हेलियनमध्ये धाडला.
आफ्रिकेकडून डेव्हिड बेडिंगघम(१२) आणि कायल वेरायन(१५) यांच्याव्यतिरिक्त कोणलाही दोन अंकी धावसंख्या करता आला नाही. सिराजसह बुमराह आणि पहिलाच कसोटी सामना खेळणारा मुकेश कुमारने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. त्यामुळे दुसऱ्या डावात सर्वोत्तम फलंदाजी करत आफ्रिकेसमोर मोठी आघाडी घेण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात हार पत्कारावी लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात उत्कृष्ट खेळ करत दोन कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत सोडविण्याचे टीम इंडियासमोर आव्हान असणार आहे.